स्वामी भक्तांना खुले झाले हडपीड येथील मठाचे महाद्वार!

स्वामी भक्तांना खुले झाले हडपीड येथील मठाचे महाद्वार!

मसुरे

देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ गुरुवारी घटस्थापना मुहूर्तावर शासनाच्या निर्देशा नुसार भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात आला. येथील रहीवाशी श्री.दत्ताराम शंकर राणे ह्या उभयतांना मठाचे महाद्वार उघडण्याचा मान देण्यात आला. यावेळी अध्यक्ष प्रभाकर राणे, श्री विनोद आईर, नंदकुमार य राणे, दत्ताराम राणे, सौ राणे, श्री.जाधव सर, श्री शिवलिंग ज़गम पुजारी आदी उपस्थित होते.
कोरोनाचे नियम पाळूनच स्वामी मठात स्वामींचे आशीर्वाद घ्यावे असे आवाहन
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबईचे अध्यक्ष प्रभाकर राणे, सचिव
श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांनी स्वामी भक्तांना केले आहे.

अभिप्राय द्या..