अन्याया विरुद्ध निर्भय पणे समोर या ; सहा. पो. उपनिरी.दशरथ चव्हाण यांचे आवाहन

अन्याया विरुद्ध निर्भय पणे समोर या ; सहा. पो. उपनिरी.दशरथ चव्हाण यांचे आवाहन

मुणगे येथे “निर्भया ” तक्रार पेटीचे उदघाटन

मसुरे

समाजामध्ये वावरताना महिलांना, शालेय विद्यार्थिनींना बऱ्याच वेळा अन्याय होत असताना शांत बसावे लागते. थेट पोलिसात तक्रार देताना मनाची तयारी होत नाही. त्यामुळे निर्भया तक्रार पेटी मध्ये तक्रार देणे अधिक सोईस्कर होणार आहे. तक्रार दाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असल्याने अन्याय झाल्यास तक्रार लेखी स्वरूपात देण्यासाठी या तक्रार पेटीचा मोठा उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन देवगड सहा पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांनी मुणगे तिठा येथे केले. देवगड तालुक्यात बहुतांश शालेय व कॉलेज परिसरात अशा प्रकारे निर्भया तक्रार पेटी लावण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मुणगे तिठा येथे निर्भया तक्रार पेटीचे अनावरण शालेय विद्यार्थिनी करीना अतुल राणे हिच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी श्री भगवती एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापक देवदत्त पुजारे,
मुख्याध्यापक श्री प्रसाद बागवे, प्रगतशील शेतकरी नाना बागवे, प्रणय महाजन, विजय पडवळ,राजू पुजारे,आ. सेवक संजय कदम, आरोग्

य सेविका सौ. एन एस चराटकर, सौ.दुर्गा परब, प्रियांका कासले, प्रदीप मिठबावकर, आशिष आईर, झुंजार पेडणेकर आदी उपस्थित होते. आभार देवदत्त पुजारे यांनी मानले.

अभिप्राय द्या..