सावंतवाडी /-

गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ८१ हजार रूपयांच्या दारूसह सुमारे अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी डिट्टो तंगचद (रा. एर्नाकुलम, केरळ, सध्या रा. सरमळे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली जीप (केएल ०१ के २९९०) ताब्यात घेण्यात आली. बांदा पत्रादेवी सीमेवरील दत्तमंदिर येथे बुधवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात केल्या जाणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलीस सीमेवर नजर ठेवून आहेत. बुधवारी मध्यरात्री ११.३० च्या सुमारास पत्रादेवी दत्तमंदिरकडे बांद्याकडे येणारी जीप तपासणीसाठी थांबवण्यात आली. तपासणीदरम्यान जिप मध्ये वरच्या बाजूस चोरकप्पा बनविल्याचे निदर्शनास आले. या चोरकप्प्यात मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या भरण्यात आल्या होत्या. ही दारू वाहतूक गोव्यातून सरमळे कडे केली जात होती. या अवैध दारू वाहतुकीवर बांदा पोलीस शिपाई प्रथमेश पवार यांनी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page