You are currently viewing आता गावो-गावी फिरणाऱ्या नंदीबैल वाल्याजवळ बैलाच्या डोक्यावर पे – स्कॅनर..

आता गावो-गावी फिरणाऱ्या नंदीबैल वाल्याजवळ बैलाच्या डोक्यावर पे – स्कॅनर..

सिंधुदुर्ग /-

गेल्या ५ /६ वर्षांपूर्वी चलन बदलामुळे अर्थव्यवस्थेत खूपच मोठे बदल झालेले पहावयास मिळाले.काळा पैसा उघडकीस आणणे हे महत्वाचे कारण होते.भारत स्वतंत्र होण्यापूर्वी देखील रोख पैशाच्या स्वरूपातच आर्थिक व्यवहार केले जात होते.मात्र अलीकडे काही वर्षात प्लॅस्टिक मनीचा (डेबीट व क्रेडीट कार्डस्) वापर वाढला. त्यामूळे भटकंती करून पोट भरणाऱ्यांना रोख रक्कम मिळण्यात अडचणी येवू लागल्या.साहजिकच प्रवाहाबरोबर जाण्याशिवाय त्यांच्या जवळ पर्यायच नव्हता.याचीच दाखल घेत,आता गावो-गावी फिरणारे नंदीबैल वाल्याने आपल्या बैलाच्या डोक्यावरच गुगल किंवा फोन पे – स्कॅनर बसवला आहे.सध्याच्या ऑनलाईन च्या जमान्यात काळाबरोबर आपणही बदलले पाहिजे.”डिजीटल म्हणजे आणखी दुसरं काय असतं रे भाऊ”?

कॅशलेस व्यवहार करताना गैरप्रकारांना आळा घालणे हे महत्वाचे असले तरी फायदेही तेवढेच आहेत. म्हणजे छापील नोटांमुळे होणारे गैरप्रकार थांबवणे (लाच देणे-घेणे), सुट्ट्या पैशाची आवश्यकता नाही, प्रत्येक व्यवहाराची नोंद आयकर विभागाकडे, धनादेश वटवण्याची गरज नाही, सुरक्षित व गरजेनुसार अनेक पर्याय उपलब्ध जसे की, प्लॅस्टिक मनी, इंटरनेट बँकीग, ई वाॅलेट/मोबाइल वाॅलेट ,यू. पी. आय. यू. एस. एस. डी., पी. ओ. एस.(पाँईट ऑफ सेल), मोबाईल बँकींग इ. होय. या सुविधा प्रत्यक्ष वापरताना कार्डधारक आपला चारअंकी पिन टाकून पैसे काढू शकतो. खरेदी करू शकतो. ही रक्कम आपल्या बँकेतून ज्याला देणार आहोत त्याच्या खात्यावर जमा होते. मात्र हे करत असताना आपला युजरनेम, पासवर्ड, ओ. टी. पी., सी. व्ही. व्ही. इत्यादी माहिती कुणालाही चुकूनही कळणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.

या आधुनिक युगाचा सहकारी होताना भटकंती करणाऱ्यांपैकी काही स्थायिक झाले, तर काही अद्यापही आपल्या जुन्या चालीरीती, रुढी, परंपरा यांना सोबत घेवून चालत आहेत. असे असताना आपणही हायटेक झाले पाहीजे, हे ओळखून गाव गाड्याचा अंश असलेले नंदीबैलवालेही कॅशलेस व्यवहारात मागे नाहीत, हेच या फोटोद्वारे स्पष्ट होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा