सावंतवाडीत पतसंस्थेच्या वर्धापन दिन उत्साहात संपन्न…

सावंतवाडी /-

पस्तीस हजार रुपये ठेवी पासून सुरू झालेला कॅथॉलिक अर्बन पतसंस्थेचा प्रवास १३० कोटींवर गेला आहे. याचे सर्व श्रेय ग्राहक व सभासदांना जाते, असा विश्वास अध्यक्ष पी.एफ.डॉन्टस यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान आतापर्यंत बँकेने ८७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून यावर्षी बँकेला १ कोटी ३४ लाख एवढा निव्वळ नफा झाला आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. पतसंस्थेचा २७ वा वर्धापनदिन सोहळा आज संस्थेच्या येथील प्रधान कार्यालयात संपन्न झाला. याप्रसंगी आयोजित पत्रकारपरिषदेत श्री.डॉन्टस बोलत होते.याप्रसंगी आयोजित पत्रकारपरिषदेत श्री. डॉन्टस बोलत होते.

यावेळी फादर अॅलेक्स डिमेलो, विल्यम सालदाना, पतसंस्थेचे व्हा. चेअरमन फ्रान्सिस डिसोजा, सेक्रेटरी मार्टीन आल्मेडा, संचालक रुजाय रॉड्रीक्स, विल्यम सालदाना, आगोस्तीन फर्नांडीस, मार्शेलिन डिसोजा, कोसेसांवमारी फर्नांडीस, सेलेस्तीन फर्नांडीस, पिटर दिया, जॉन नोरोन्हा, जासींत लोबो, रिचर्ड डिसिल्वा, जॉन फर्नांडीस, श्रीमती आनमारी डिसोजा, सर व्यवस्थापक जेम्स बॉर्जिस आदी उपस्थित होते. श्री.डॉन्टस पुढे म्हणाले, बँकेच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी विशेष ठेव योजना जाहीर करण्यात आली आहे. यात २७ महिने मुदतीच्या ठेवीवर १०% व्याज दिले जाणार आहे. तर उत्सव ठेव योजनेच्या माध्यमातून सोळा महिन्यांच्या ठेवीवर साडे नऊ टक्के व्याज दिले जाणार आहे. तसेच पगारदार वर्गाला आता पतसंस्थेच्या माध्यमातून १००% कर्ज दिले जाणार आहे. तर इतर कर्जदारांना ९ हजार ९९९ रुपये व महिलांसाठी ५ हजार ५५५ रुपये डाऊन पेमेंटवर वाहन कर्ज मिळणार आहे. याचा ग्राहकांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही पतसंस्थेच्या माध्यमातून श्री. डॉन्टस यांनी केले. यावेळी कॅथॉलिक धर्म प्रांतातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती देणाऱ्या डिरेक्टरीचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page