You are currently viewing राज्यभरात बंद असलेली बीडीएस प्रणाली पूर्ववत सुरू.;शिक्षक परिषदेच्या प्रयत्नांना यश..

राज्यभरात बंद असलेली बीडीएस प्रणाली पूर्ववत सुरू.;शिक्षक परिषदेच्या प्रयत्नांना यश..

सिंधुदुर्ग /-

जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी सेवानिवृत्ती प्रकरणे जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातून बीडीएस प्रणालीद्वारे मंजूर करण्यात येतात गत सहा महिन्यांपासून अर्थ विभागातील बीडीएस संपूर्ण राज्यभरात तांत्रिक कारणास्तव बंद असल्याने राज्यातील हजारो शिक्षकांची देयके प्रलंबित होती बंद असलेली बीडीएस प्रणाली पूर्ववत सुरू होणे कामी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने अनेक वेळेस निवेदने देण्यात आली होती आली होती तरीदेखील बीडीएस प्रणाली सुरू होण्यास विलंब होत होता सदर विषयाचा दबावगट तयार करण्यात यावा या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग आणि राज्यभरात माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग श्री मनोज सौनिक यांना ई-मेल निवेदन मोहीम राबविण्याबाबत निर्णय घेतला या ई-मेल निवेदन मोहिमेत राज्यभरातील सत्तावीस जिल्ह्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून हजारो मेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अतिरिक्त मुख्य सचिव श्री मनोज सौनिक साहेब यांना गेले होते शिक्षक परिषदेचे ज्येष्ठ नेते रावसाहेब रोहकले गुरुजी यांच्यानेतृत्वाखाली मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिव यांची भेट घेऊन सदर विषय निवेदन देण्यात आले होते.

त्या वेळेस राज्यभरातून हजारो मेल प्राप्त झाल्याचे सचिव महोदयांनी सांगून सदर विषय हा अत्यंत गंभीर असल्याचे प्रशासनाने त्यात गांभीर्यपूर्वक लक्ष घालून काल दिनांक ५ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता अधिकृत बीडीएस प्रणाली सुरू करण्यात आली होती महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सर्वप्रथम या बीडीएस प्रणालीद्वारे अनेक शिक्षकांची देयके मंजूर करण्यात आली होती.

सदर लढ्यात दिनांक ४ ऑक्टोबर रोजी म.रा.शिक्षक.प. गडचिरोली जिल्हा अध्यक्ष विजय साळवे, राज्य उपाध्यक्ष अविनाश तालापलीवार, राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे यांनी मंत्रालयात उपसचिव वित्तविभाग व उप सचिव शालेय शिक्षण (वित्तशाखा) मंत्रालय मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून या विषयावर चर्चा करून सदर प्रश्न तातडीने मार्गीलावण्यास विनंती केली असता सदर प्रकर आजच मार्गी लावून देण्याची कार्यवाही करत असल्याचे आश्वासन देऊन ती पुर्ण केली. तसेच महाराष्ट्रातील तमाम पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवल्याने या सर्वांचे शिक्षक परिषदेच्या वतीने अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, शाखा सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी दिली.

अभिप्राय द्या..