You are currently viewing वेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने यश मिळवुन ‘शत – प्रतिशत भाजपा’ चा शुभारंभ केला ; संध्या तेरसे

वेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने यश मिळवुन ‘शत – प्रतिशत भाजपा’ चा शुभारंभ केला ; संध्या तेरसे

वेंगुर्ला
वेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या शितल आंगचेकर हिने महाविकास आघाडीचे विधाता सावंत यांचा पराभव करून वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष भाजपाचे झाल्यामुळे वेंगुर्ले तुन ” शत – प्रतिशत भाजपा ” ची सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांनी केले.
भाजपा वेंगुर्ले च्या वतीने नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर हिचा सत्कार तालुका कार्यालयात महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना संध्या तेरसे म्हणाल्या की,भारतीय जनता पार्टीची ताकद आता पुर्ण देशात वाढत चालली असुन जनतेचे समर्थन भाजपाला मिळत आहे.विरोधक सत्तेसाठी आघाड्या करत आहेत.परंतु सिंधुदुर्गात आघाडीची बिघाडी करायचा शुभारंभ वेंगुर्लेतुन करण्यात आला. याबद्दल भाजपा – वेंगुर्ले चे अभिनंदन करण्यात आले.तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वामुळे कोकणच्या बदलत्या समीकरणाची झलकही त्यामुळे दिसली.वेंगुर्ले नगरपरिषदेत महाविकास आघाडीला धोबीपछाड देत भाजपा ने विजयाचा झेंडा रोवला, याबद्दल भाजपा – वेंगुर्ले चे अभिनंदन केले.या सत्कार समारंभामध्ये प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण , नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप , जि.का.का.सदस्य वसंत तांडेल ,ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी सत्काराला उत्तर देताना उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर म्हणाल्या की , मिळालेल्या संधीचे सोने करुन शहरामध्ये भाजपा वाढविण्यासाठी प्रयत्न करीन. तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन असे सांगितले .
यावेळी या सत्कार समारंभाला जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत , नगरसेवक प्रशांत आपटे, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, ता.चिटनीस समिर चिंदरकर – समीर कुडाळकर, सोशल मिडीयाचे राजवीर पाटील, महिला जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर,ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर,परबवाडा सरपंच पपु परब,अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, महिला मोर्चा ता.सरचिटणीस वृंदा गवंडळकर , ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाट – आनंद ऊर्फ बिट्टु गावडे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, युवा मोर्चा चे अमेय धुरी – राहुल मोर्डेकर – निलय नाईक, शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे – कमलेश गावडे, वजराट सरपंच महेश राणे, महिला मोर्चा च्या वृंदा मोर्डेकर – रसिका मठकर – श्रद्धा धुरी, बुथप्रमुख शेखर काणेकर, कार्यालय प्रमुख छोटु कुबल आदी उपस्थित होते.सत्कार समारंभाचे सुत्रसंचालन व आभार जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी मानले.

अभिप्राय द्या..