You are currently viewing कै.श्रीधर नाईक चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवा आमदार नितेश राणेंची जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे मागणी..

कै.श्रीधर नाईक चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवा आमदार नितेश राणेंची जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे मागणी..

कणकवली /-

२७ ऑगस्ट, २०२१ रोजी केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी राजकीय विरोधकांचा कणकवली नरडवे फाटा येथील कै. श्रीधर नाईक यांच्या पुतळ्याजवळ अनुचित प्रकार घडवण्याचा डाव होता. त्यामुळे कणकवलीसह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. त्याचा विचार करता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कै. श्रीधर नाईक चौकात सीसीटीव्ही कॅमेरा लवकरात लवकर बसवण्यात यावा, अशी मागणी आम. नितेश राणे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. तसेच याबाबत निधीची उपलब्धता नसल्यास माझ्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत तरतूद करण्यात येईल, असे आम. नितेश राणे यांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या..