You are currently viewing जानवली येथे अपघात धडक देऊन कार चालक पसार.;दोन आरोग्य कर्मचारी गंभीर जखमी..

जानवली येथे अपघात धडक देऊन कार चालक पसार.;दोन आरोग्य कर्मचारी गंभीर जखमी..

कणकवली /-

कणकवली जानवली ग्रामपंचायत नजीक सकाळी 9.30 च्या सुमारास मोटारसायकलने लसीकरणासाठी जात असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लाल रंगाच्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली.

या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान कार चालक धडक देऊन गोव्याच्या दिशेने पसार झाल्याने सर्व पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखेला कळविण्यात आलेले आहे.
या अपघाताची माहिती समजताच महामार्ग वाहतूक पोलीस विभागाचे स.पो. नि.अरुण जाधव मार्गदर्शनाखाली मिठबावकर तसेच अन्य वाहतूक पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले.

अभिप्राय द्या..