मालवणात मत्स्य व्यवसायिक बाबला पिंटो यांच्या गोडाऊनला आग.;५ लाखांचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी

मालवणात मत्स्य व्यवसायिक बाबला पिंटो यांच्या गोडाऊनला आग.;५ लाखांचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी

मालवणा /-

दांडी चर्च समोर मत्स्य व्यवसायिक बाबला पिंटो यांच्या मासेमारी साहित्य ठेवण्याच्या गोडाऊनला मंगळवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. वेळीच स्थानिक नागरिक व मच्छिमार यांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र गोडाऊन मध्ये ठेवण्यात आलेली मासेमारी जाळी, बॅरल व अन्य मासेमारी साहित्य तसेच गोडाऊन चे छप्पर जळून सुमारे ४ ते ५ लाखाचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आग लागल्याची माहिती मालवण नगरपालिकेला देण्यात आली. मात्र अग्निशमन यंत्रणा नसल्याने स्थानिक नागरिकांनी पाणी व अन्य आग विझवण्याच्या साहित्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधीनीही त्या ठिकाणी धाव घेतली होती.

अभिप्राय द्या..