You are currently viewing वेंगुर्ले नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी शितल आंगचेकर यांची वर्णी

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी शितल आंगचेकर यांची वर्णी

वेंगुर्ला

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज पोटनिडणुक घेण्यात आली. या निवडीसाठी विधाता सावंत विरुद्ध शितल आंगचेकर अशी लढत झाली. यामध्ये सावंत यांना ७ मते तर आंगचेकर यांना १० मते मिळाल्याने त्या निवडून आल्या आहेत. दरम्यान तुषार सापळे या निवडणुकीत तटस्थ राहिले.सध्या रिक्त असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज ५ ऑक्टोबर २०२१ रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली. या एका जागेसाठी शितल ज्ञानेश्वर आंगचेकर, विधाता रमाकांत सावंत व साक्षी प्रशांत पेडणेकर या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये तिन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळी साक्षी पेडणेकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने आंगचेकर विरुद्ध सावंत अशी थेट लढत झाली.यानंतर घेण्यात आलेल्या निवडणुकीत शितल आंगचेकर यांना १० मते व विधाता सावंत यांना ७ मते मिळाल्याने शितल आंगचेकर यांची उपनगराध्यक्ष पदी वर्णी लागली.यावेळी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी काम पाहिले.दरम्यान आजच्या निवडीच्या वेळी वेंगुर्ले न. प. च्या सभागृहात या पोट निवडणुकीच्या विशेष सभेत नगराध्यक्ष दिलीप गिरप, उमेदवार विधाता सावंत, शितल आंगचेकर, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डीचोलकर, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, शैलेश गावडे, कृतिका कुबल, साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, स्नेहल खोबरेकर, कृपा गिरप मोंडकर, अस्मिता राऊळ, तुषार सापळे, आत्माराम सोकटे, संदेश निकम, सुमन निकम उपस्थित राहून भाग घेतला.यावेळी मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे व अन्य अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा