You are currently viewing फिट इंडिया व पॅन इंडिया जनजागृती रॅली ; बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज व दिवाणी न्यायालय वेंगुर्ला चे आयोजन

फिट इंडिया व पॅन इंडिया जनजागृती रॅली ; बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेज व दिवाणी न्यायालय वेंगुर्ला चे आयोजन

वेंगुर्ला
देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भारत सरकारकडून या वर्षभरात आजादी का अमृत महोत्सव या मोहिमेअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.त्याच्याच एक भाग म्हणून २ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी एनसीसी विभाग बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर कॉलेज आणि दिवाणी न्यायालय वेंगुर्ला यांच्या समन्वयाने फिट इंडिया व पेन इंडिया जनजागृती रॅलीचे आयोजन वेंगुर्ला शहरात करण्यात आले होते.सदर रॅलीची सुरुवात दिवाणी न्यायालय येथून होऊन हॉस्पिटल नाका मार्गे ते मारुती मंदिर व पावर हाऊस या ठिकाणावून परत दिवाणी न्यायालय येथे येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीला सुरुवात करण्यापूर्वी दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश पाटील यांनी म.गांधीच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण केला. तर बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देऊलकर,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.आनंद बांदेकर व एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट डॉ. बी.जी. गायकवाड यांनी दीपप्रज्वलन केले. यावेळी सन्माननीय न्यायाधीशांनी उपस्थित एन.सी.सी कॅडेट्स व न्यायालयीन कर्मचाऱ्यांना पॅन इंडिया जनजागृती रॅली च्या आयोजनाचा हेतू विषद केला. सदर आयोजित रॅलीमध्ये एनसीसीचे ४० कॅडेट्स सहभागी झाले होते.

अभिप्राय द्या..