You are currently viewing सावंतवाडी तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारच्या मुलाकडून लादले मातृत्व..

सावंतवाडी तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारच्या मुलाकडून लादले मातृत्व..

मुलीच्या आई वाडीलांनी केला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारच्या अल्पवयीन मुलाकडून मातृत्व लादले आहे.याचा सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा तिच्या शेजारी राहणा-या १६ वर्षीय मुलाकडून घडला आहे. संबंधित मुलगी तीन महिन्याची गर्भवती बनली आहे.यादरम्यान याप्रकरणी संबंधित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार येथील पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, हा प्रकार दोन दिवसापूर्वी उघड झाला.संबंधित मुलीचे आई-वडील तिला तपासणीसाठी सावंतवाडी शहरातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले होते.यावेळी ती मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे तपासात निष्पन्न झाले.याबाबतची माहिती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना दिल्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यात आली.दरम्यान आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित मुलावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..