You are currently viewing मालवण येथे युवा फोरम संस्थेची नवीन युवक व स्वयंसेवकां सोबत बैठक..

मालवण येथे युवा फोरम संस्थेची नवीन युवक व स्वयंसेवकां सोबत बैठक..

मालवण /-

मालवण येथे युवा फोरम संस्थेतर्फे मालवण येथील नवीन युवक व स्वयंसेवकां सोबत बैठक घेण्यात आली.ह्यावेळेस सर्वप्रथम युवकांकडून त्यांना समाजात हवे असलेले बदल जाणून घेण्यात आले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष यशवर्धन राणे व सचिव हितेश कुडाळकर यांनी त्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले जसे की समुद्रकिनारे साफ करणे, प्राण्यांचे संगोपन , मिशन सिंड्रेला, हवामानातील होत असलेले बदल व उपाय व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मालवणच्या युवकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. ह्यावेळी युवा फोरम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवर्धन राणे, सचिव ॲड.हितेश कुडाळकर, हार्दिक कदम, शुभम सिंदगीकर, रोहन करमलकर व मालवणचे स्वयंसेवक व युवक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..