You are currently viewing सिंधुदुर्ग बँक संचालक पदासाठी अरुण गिरकर इच्छुक..

सिंधुदुर्ग बँक संचालक पदासाठी अरुण गिरकर इच्छुक..

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग बँक निवडणूक येऊ घातलेल्या सिंधुदुर्ग बँक निवडणूक मध्ये आम्ही बँकेचे सभासद असून सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक म्हणून संचालक पदासाठी इच्छुक आहोत असे मत अरुण गिरकर यांनी मांडले

संबंधीत खातेदारांची व सभासदांची संचालक पदासाठी निवड व्हावी प्रत्येक वेळी संचालक पदासाठी राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्ते नेमले जातात बाकीच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना ती जबाबदारी मिळत नाही किंवा त्यांचा विचारही कोणी करत नाही एक माणूस दोन वेळा संचालक म्हणून कार्य करत असतो त्यापेक्षा सभासदांना किंवा खातेधारकांना ज्यांची इच्छा असेल त्यांना समान संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे संबंधित बँकेच्या अध्यक्षांनी याचा विचार करावा अशी आमची मागणी आहे जेणेकरून सभासदांना पण बँकेचा कार्यभार कार्यभार कसा चालतो याची माहिती मिळेल साखर कारखान्यांना दिले गेलेले कर्जे त्यांची वसुली होत आहे की नाही याची कल्पना येईल सध्या बर्‍याच बँका तोट्यात आहेत तसेच साखर कारखानेही डबघाईला आलेले आहे अशा वेळी थकीत कर्जे झाली तर त्याचा परिणाम बँक खाते धारकांच्या पैशांवर होतो महाराष्ट्रात बऱ्याच बँका डबघाईला त्यामुळे त्यांची वसुली वेळेवर होत नव्हती अशी कारणे आता समोर येत आहेत त्यामुळे आपल्या बँकेचे वसुली योग्य प्रकारे होत आहे की नाही बँक अधिकारी व संचालकांनी माहिती करून घेणे गरजेचे आहे असे असे ते म्हणाले.

अभिप्राय द्या..