कुडाळ /-

कुडाळ राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष आबा मुंज यांचे अल्पशा आजाराने आज पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजाराशी झुंजत होते. अनेक ठिकाणी उपचार घेऊन सध्या त्यांच्यावर गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यातून ते सावरले नाहीत. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सकाळी ९ ते १०:३० वाजेपर्यंत ठेवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर कोचरेवाडी येथील बागेत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आबा मुंज म्हणजे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते संपूर्ण जिल्ह्यात अशीच त्यांची ओळख होती राजकारणाच्या सारीपाटात पाटा खालून उलटसुलटकिती पाणी वाहत गेलं तरी आबा मुंज हे काँग्रेसच्या सरळ प्रवाहातच राहिले नव्हे रमले जिल्ह्यात काँग्रेसने अनेक चढ-उतार पाहिले मात्र यामध्ये मुंज एकांड्या शिडासारखे कट्टर राहिले त्यामुळे काँग्रेसचा तक्त कुडाळ तालुक्यातहालता राहिला विरोधकांनाही त्यांचा विचार करायला लागला काँग्रेस पक्षाने आबा मुंज याना तसीम्हणावी तसी काहीच पदे दिलीनाहीत मात्र त्यांचा त्यांनी कधीच विचार केला नाही स्वाभिमान एक निष्ट पणा काय असतो हेत्यानी आपल्या कृतीतून दाखवून दिले. जिल्ह्यात काँग्रेस रिकामी झाली तरी ही रिकामी जागा भरून काढण्याचे काम जिल्ह्यात काही मोजक्या मंडळींनी केले त्यात आबामुंज यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल ते नेहमी सांगत वरच्या नेत्यांना काही देणंम घेणंम नसते तुम्ही खाली काय करता याकडे ते बघत नाही मात्र आपण जी विचारधारा अंगीकारली आहे त्याच्याशी प्रतारणा करणे योग्य नाही वर्षाने विचारलेच नाही तरी चालेल आपण आपले काम निष्ठेने करत राहिले पाहिजे असा त्यांचा कानमंत्र नेहमीच कार्यकर्त्यांना असायचा यातूनच त्यांनी कुडाळ तालुक्याची काँग्रेस सांभाळली काँग्रेस म्हटल्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही आबा मुंज असंच नाव घ्यायचे एवढी ओळख त्यांनी निर्माण केली होती आजच्या बदलत्या राजकारणात आबा मुंजयानात्रासही झाला मात्र ते आपल्या विचारापासून ढळले नाहीत असा हा काँग्रेसचा एकनिष्ठ हात निखळल्याचे अतीव दुःख भरून न येणारे आहे आबा मुंजा यांना लोकसंवाद लाईव्ह समूहाकडून भावपूर्ण श्रद्धांजली..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page