You are currently viewing लुपिन फाउंडेशनच्या वतीने कुडाळ आंबेडकर नगर येथे लहान मुलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर संपन्न..

लुपिन फाउंडेशनच्या वतीने कुडाळ आंबेडकर नगर येथे लहान मुलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर संपन्न..

कुडाळ /-

लुपिन फाउंडेशन व लायन्स क्लबच्या वतीने कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे लहान मुलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर संपन्न झाले. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सुमारे ३० मुलांची तपासणी या शिबिरामध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
लुपिन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील लहान मुलांच्या आरोग्य तपासणीचे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला यामध्ये लायन्स क्लब नही सहभाग दर्शवला होता या शिबिरामध्ये डॉ. अमोघ चुबे व डॉ. सौ. सुशांता कुलकर्णी यांनी मुलांची तपासणी केली यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ अस्मिता बांदेकर, सौ. नयन भणगे, सौ. मेघा सुकी, सौ. माने, लुपिन फाऊंडेशनचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत म्हापणकर, तालुका कार्यक्रम अधिकारी नारायण कोरगावकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..