You are currently viewing आचरा नस्तावर मासेमारी नौका दुर्घटनाग्रस्त

आचरा नस्तावर मासेमारी नौका दुर्घटनाग्रस्त

आचरा

मासेमारीसाठी आचरा बंदरातुन  सकळच्या सुमारास
समुद्रात मासेमारी नौका जात  असताना गाळाने भरलेल्या आचरा बंदरनस्तावर  नौका आली असता रुतल्याने अडकून पडली होती. एका बाजूला नौका कलंडल्याने नौकेत पाणी भरले होते.  रविवारी घटना सकाळी 6.30 सुमारास आचरा समुद्रात नस्ताजवळ घडली. नौका दुर्घटनाग्रस्त  झाल्याचे समजताच स्थानिक मच्छिमारांनी धाव घेत मदतकार्य चालू केले होते. नौकेवरील 5 खलाशना सुखरूप बाहेर काढण्यात आले.  3 तासाच्या अथक प्रयत्नाने बुडालेल्या  नौकेसह जाळी इंजिन बाहेर काढण्यात मच्छिमारांना यश आले. या घटनेत  इंजिनचे  नुकसान झाले.

रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आचरा बंदरातून विघ्नहर्ता मासेमारी नौका 5 खलाशीसह आचरा बंदरातून मासेमारीसाठी समुद्रात निघाली होती. खाडीतून समुद्रात जाताना आचरा बंदर नस्तावर आली असता सुकती असल्याने मासेमारी नौका साठलेल्या गाळात रुतल एका बाजूला कलंडली. नौका रुतल्याने इंजिनही बंद झाले होते. इंजिन बंद झाल्याने एका बाजूला कलंडलेल्या नौकेत पाणी भरत होते

मासेमारीची नौका दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती मिळताच आचरा बंदरावरील मच्छीमार चावल मुजावर,  मुजावर, असिफ मुजावर, वसीम मुजावर, रियान मुजावर, सतीश आचरेकर, व अन्य मच्छिमारांनी धाव घेत होड्यांच्या साह्याने अपघातग्रस्त नौका गाठली. आतील खलाशांना नौकेतून बाहेर काढत नौकेला व दोरखंड बांधून अडवण्यात आली होती. त्यानंतर नौकेत भरलेले पाणी काढून दुसऱ्या नौकेच्या सहाय्याने दोरखंड बांधून अडकलेली नौका बाहेर काढण्याचे प्रयत्न चालू होते. 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर  दुर्घटनाग्रस्त पात आचरा बंदरात आणण्यात मच्छीमारांना यश आले. मात्र नौकेच्या  इंजीनात पाणी गेल्याने इंजिनाचे नुकसान झाले आहे.

अभिप्राय द्या..