You are currently viewing ममता बॅनर्जी 58हजार मतांनी विजयी..

ममता बॅनर्जी 58हजार मतांनी विजयी..

कोलकाता /-

भवानीपूर –

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभा जागेसाठी झाले पोटनिवडणुकीत जबरदस्त विजय मिळविला आहे. ममतांनी भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांचा 58832 मतांनी पराभव केला. ममतांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली होती. या पोट निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना एकूण 84709 मतं मिळाली. तर भाजपच्या प्रियंका टिब्रेवाल यांना 26320 मतं मिळाली. तर सीपीएम उमेदवार श्रीजीब यांना केवळ 4201 मतेच मिळू शकली.
भाजप उमेदवार प्रियंका टिब्रेवाल यांनी आपला पराभव स्वीकारत म्हटले आहे, मी पराभव स्वीकार करते. पण, मी न्यायालयात जात नाही. ते लोक म्हणत होते, की ममता 1 लाख मतांनी जिंकतील. पण त्यांना जवळपास 50 हजार मते मिळाली आहेत. मी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करते. मात्र, त्यांनी ज्या पद्धतीने निवडणूक जिंकली, ते सर्वांनीच पाहिले आहे.

अभिप्राय द्या..