You are currently viewing वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

वेंगुर्ला
वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ अंतर्गत आज (२ ऑक्टोबर) आयोजित केलेल्या सायकल रॅलील सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहात ही रॅली यशस्वी केली.वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर राहिली असून त्या अनुषंगाने दि.२६ जुलै ते दि. २ ऑक्टोबर या कालावधीत नगरपरिषदेतर्फे स्वच्छता व पर्यावरण संवर्धन जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला होता.त्याचाच एक भाग म्हणून आज गांधी जयंतीचे औचित्य साधून शहरात सायकल रॅली आयोजित केली.या रॅलीचा शुभारंभ नगरपरिषद कार्यालयाकडून स्वच्छता संदेश दूत सुनिल नांदोस्कर यांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून करण्यात आला. न.प.कार्यालय, हॉस्पिटल नाका, कॅम्प, राऊळवाडा, शिरोडा नाका, जुना स्टॅण्ड, दाभोली नाका, बाजारपेठमार्गे पुन्हा न.प.कार्यालय अशी ही सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, नगरसेवक प्रशांत आपटे,नगरसेविका कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, शितल आंगचेकर, पूनम जाधव, प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांच्यासह नगरपरिषदेचे प्रशासकीय कर्मचारी, स्वच्छ ता कर्मचारी, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि डॉक्टर्स फॅटर्निटसायकल क्लब, वेंगा बॉयज् क्लबचे सदस्य सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा