You are currently viewing पंचायत समिती वेंगुर्ला येथे<br>महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

पंचायत समिती वेंगुर्ला येथे
महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

वेंगुर्ला
आज २ ऑक्टोबर रोजी तालुक्यात स्वच्छ भारत दिना निमित्ताने पंचायत समिती वेंगुर्ला येथे सभापती अनुश्री कांबळी व गटविकास अधिकारी उमा पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच स्वच्छ भारत दिवस निमित्त चित्ररथ उद्घाटन सभापती यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. हा चित्ररथ तालुक्यातील ग्रामपंचायत कडे प्रचार प्रसिद्धी करणे करिता पाठविणेत आला. यावेळी गटविकास अधिकारी उमा पाटील बीआरसी नाईक,सीआरसी परब व कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..