You are currently viewing वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदाची पोटनिवडणुक ५ ऑक्टोबरला

वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदाची पोटनिवडणुक ५ ऑक्टोबरला

वेंगुर्ला
सध्या रिक्त असलेल्या वेंगुर्ले उपनगराध्यक्ष पदासाठी पोटनिवडणूक ५ ऑक्टोबरला २०२१ रोजी होणार असून जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे याबाबतचे आदेश नोटीसद्वारे दिले आहेत.त्यामुळे आता उर्वरित काही कालावधीसाठी या पदावर कोण विराजमान होईल याच्या चर्चा शहरात सुरू झाल्या आहेत.येथील मच्छिमार्केटचे बांधकाम करताना प्रस्थापित झालेल्या त्या १५ गाळेधारकांवर नुतन सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील गाळे देताना अन्याय होत असल्याचा आरोप करत अस्मिता राऊळ यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा २६ ऑगस्ट रोजी दिला होता. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी राजीनामा मंजूर केला होता. दरम्यान या रिक्त उपाध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीसाठी ५ ऑक्टोबर रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विशेष सभा घेण्यात येणार असून उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी हे या सभेचे अध्यक्षपद भूषवतील. ५ रोजी दुपारी ११ ते १ या वेळेत उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने स्वतः मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशनपत्र सादर करावे. यानंतर नामनिर्देशनपत्रांची छाननी होऊन उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येईल. तसेच यानंतर मतदान होऊन पीठासीन अधिकाऱ्यांमार्फत निकाल जाहीर केला जाईल. असा उपनगराध्यक्ष पद निवडीचा कार्यक्रम देण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..