परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण

वेंगुर्ला
तालुक्यातील परुळे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकेचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य सचिन देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. कै. सुनिल म्हापणकर यांचे रुग्णवाहिकेचे स्वप्न पूर्ण झाल्याने त्यांच्या प्रतिमेस यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र शासन, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून ही रुग्णवाहिका प्राप्त झाली असून तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी यांनी यासाठी सतत पाठपुरावा केल्याने गेल्या कित्येक वर्षाची मागणी पूर्ण झाली आहे. रुग्ण वाहिका नसल्याने जिल्हा परिषद सदस्य कै. सुनिल म्हापणकर यांच्या मनात किती वर्षे याची खंत होती. त्यांनी सुद्धा यासाठी सतत पाठपुरावा केला होता. अशी माहिती यावेळी सचिन देसाई यांनी दिली.यावेळी म्हापण उपतालुकाप्रमुख मनोहर येरम, विभागप्रमुख योगेश तेली, युवासेना विभागप्रमुख विजय घोलेकर, उपविभागप्रमुख वसंत साटम, युवासेनेचे रोहित म्हापणकर, चिपी सरपंच गणेश तारी, कोचरा सरपंच साची फणसेकर, भोगवे सरपंच रुपेश मुंडये, म्हापण सरपंच अभय ठाकूर,उपसरपंच अशोक पाटकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य अजित परुळेकर, भोगवे शाखाप्रमुख गुरुनाथ गायकवाड, केळुस माजी सरपंच योगेश शेट्ये,उमेश नेवाळकर, अनिल दाभोलकर, उदय दाभोलकर, कुशेवाडा शाखाप्रमुख उमाकांत परब, म्हापण शाखाप्रमुख प्रशांत ठाकूर, परुळे सोसायटी व्हाईस चेअरमन शरद हडकर, प्राथमिक आरोग्य केंद्र परुळेचे डॉ. कोळी, डॉ. चिंदरकर, सी. एस. म्हापणकर, आरोग्य सेविका मांजरेकर, राजाराम हडकर, कोचरा आरोग्य सेवक संभाजी आचरेकर, नेत्र चिकित्सक रामचंद्र तेली, आरोग्य सहाय्यक गंगावणे आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..