कणकवली /-

कणकवली शहरातील भाजी, फळ, फुले विक्रेत्यांना नगरपंचायतीने फ्लाय ओव्हर ब्रिज खाली आखुन दिलेली जागा ही शहराच्या नियोजनाच्या दृष्टीने योग्य आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने केलेले हे नियोजन कणकवली शहराच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने योग्य असतानाच, अस्ताव्यस्त बसलेल्या भाजी, फळ, फुले विक्रेत्यामुळे शहराला निर्माण झालेला बकालपणा या माध्यमातून दूर झाला आहे. त्यामुळे सध्या केलेले नियोजन हे कोणतेही बदल न करता त्याच स्थितीत ठेवावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी केली आहे. त्यासोबत कणकवली नगरपंचायत अंतर्गत शिवाजीनगरमधील रस्त्याच्या कामासाठी नगरपंचायत ने नगरोत्थान योजनेच्या माध्यमातून 38 लाखांचा निधी मंजूर केला आहे. सदर रस्ता हा माझ्या प्रभागात येत असल्याने पावसाळा झाल्यानंतर या रस्त्याचे काम मार्गी लावून घेण्यात येणार आहे. यावर्षी तोक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सर्वत्रच लवकर पावसाळा सुरू झाला. त्यामुळे जिल्ह्यात ज्याप्रमाणे इतर रस्त्यांची कामे थांबली तशीच कणकवलीत ही थांबली. या रस्त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, पावसाळा संपताच हे काम देखील निश्चितच नगरपंचायत च्या माध्यमातून पूर्ण करून घेतले जाईल अशी माहिती श्री नाईक यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page