You are currently viewing वीज बीलावरील पठाणी व्याज कमी करा<br>भाजपचे आचरा विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक

वीज बीलावरील पठाणी व्याज कमी करा
भाजपचे आचरा विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक

आचरा /-

कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने थकीत वीज बिलावरील पठाणी व्याज दर कमी करा,वीज बीले टप्प्याटप्प्याने भरुन घ्या,वीज ग्राहकांना त्रास दिल्यास आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा देत आचरा विभागिय भाजपा कार्यकर्त्यांनी बुधवारी आचरा विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक दिली. यावेळी येथे कार्यरत सहाय्यक अभियंता संतोष सरवळे यांना निवेदन देत सदर मागण्यांची पंधरा दिवसांत पुर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी दिला आहे.
कोरोना काळात व्यवसाय ठप्प झाल्याने मेटाकुटीस आलेल्या व्यावसायिकांचे विद्यूत बील टप्प्या टप्प्याने भरून घ्यावे, बीलावरील पठाणी व्याजदर कमी करावेत,गंजलेले पोल बदलावेत, काही ठिकाणी उघड्या अवस्थेत असलेले ट्रास्फार्मर मुळे धोका होवू शकतो याबाबत लक्ष घालून कार्यवाही व्हावी आदी मागणी करत भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप
कार्यकर्त्यांनी बुधवारी आचरा विद्यूत मंडळ कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य जेराँन फर्नांडिस, हडी सरपंच महेश मांजरेकर, संतोष गांवकर,प्रकाश मेस्त्री, मनोज हडकर, समिर बांवकर,देवेंद्र हडकर, यांसह अन्य भाजप कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा