You are currently viewing नमस्कार मी लोकराजा सुधीर कलिंगण बोलतोय..

नमस्कार मी लोकराजा सुधीर कलिंगण बोलतोय..

कुडाळ /-

तोंड हे प्रत्येक माणसाच साक्षात धनुष्यच असत आणी त्या धनुष्यरूपी तोंडातून निघणारा प्रत्येक शब्द हा साक्षात बाणाच्या रुपात असतो,त्याच प्रत्येक शब्दांचा मी प्रेम आपुलकी जिव्हाळ्याचे बंधन निभावत प्रत्येक वेळी वापर करत आलो.म्हणून माझे संबंध कधीच कोणाशी दुरावले नाहीत.त्यामुळेच आजच्या घडीला मालक चालक संघटना असो किंवा सध्याच्या घडीला जिल्हास्तरावरती कार्यरत असणाऱ्या दशावतारी कलाकारांच्या इतर सर्व संघटना असोत माझे सर्वांशीच मित्रत्वाचे संबंध राहीले आहेत आणि भविष्यातही ते संबंध तसेच रहाणार आहेत ते माझ्या स्वभावच प्रतिक आहे.माझ्या प्रामाणिक व्यक्तीमत्वाचा तोच पैलू लक्षात घेऊन आदरणीय खासदार विनायक राऊत साहेब, आदरणीय पालकमंत्री उदय सामंत साहेब,आदरणीय आमदार दिपकभाई केसरकर साहेब,आदरणीय आमदार वैभव नाईक साहेब या सर्वांनी माझी एकमताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या लोककला पथकांच्या अनुदान मंडळावर माझी दिनेश गोरे यांच्या बरोबरीने सदस्य पदी निवड केली त्याबद्दल मी सर्वप्रथम लोकराजा सुधीर कलिंगण आदरणीय खासदार साहेब,पालकमंत्री साहेब,आमदार साहेब यांचे मनपुर्वक आभार मानतो.आपल्या जिल्ह्याला कलाप्रेमी खासदार,पालकमंत्री,आमदार लाभले हे मी एक दशावतारी कलाकार म्हणून माझ्या सहीत सर्व दशावतारी कलाकारांच भाग्य आहे असे जाहीर करतो.
खासदार ,आमदार,पालकमंत्र्यांनी दशावतारी क्षेत्राला दिलेल्या योगदानाबद्दल सांगायच झाल तर त्यांनीच दाखवलेल्या प्रासंगीकतेमधून बालगंधर्व पुरस्कार विजेते ओमप्रकाश चव्हाण यांच्या आजारपणाच्या वेळी भरघोस अस आर्थिक योगदान झाल,जना चोपडेकर,शंकर मोर्ये,यशवंत तेंडोलकर,जीजी.चोडणकर,विनायक कोणकर,पी.सी.नाईक,
भजनसम्राट कृष्णा पवार या सर्वांच्या आजारपणाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांवरती भयानक प्रसंग उभा राहीला त्यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने खासदार,आमदार ,पालकमंत्री यांनी दिलेल आर्थिक स्वरूपाच योगदान देवदूत स्वरूपाचच म्हणाव लागेल.कारण प्रसंगाला जो आर्थिक स्वरूपाची मदत करतो तो माझ्या मते साक्षात देवदूताच्या रूपातच असतो.या ठीकाणी आर्थिक स्वरूपाच्या योगदानाबद्दल आदरणीय उद्योजक दत्ता सामंत यांचाही नेहमीच आर्थिक स्वरूपाचा सिंहाचा वाटा आहे हे कधीही विसरून चालणार नाही.पुर्वीच्या काळी दशावतारी कला ही सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतीच मर्यादित होती सर्वप्रथम या कलेला मुंबापुरीसारख्या महासागरात मानाच व्यासपीठ मीळवून देण्याचे पवित्र कार्य शिवसेना पक्षानेच केल.त्यातून दशावतारी कलाकारांना प्रतिवर्षी आर्थिक स्वरुपाच फार मोठ योगदान प्राप्त होत.माझ्यासहीत अनेक कलाकारांना जे पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्याच अर्धआधिक श्रेय शिवसेना पक्षालाच जात.कुडाळ येथील सिध्दीविनायक सभागृहाच्या रंगमंचावर आमदार वैभव नाईक यांच्या नियोजनातून सेनेच्या वतीने जो दशावतारी मोहोत्सव आयोजित केला गेला त्या महोत्सवात अनेक जुन्यानव्या कलाकारांचे आर्थिक स्वरूपाचे योगदान देऊन मानसन्मान करण्यात आले त्याचही श्रेय खासदार,आमदार,पालकमंत्र्यांनाच जात.पार्सेकर दशावतार मंडळाच्या गाडीचा अपघात झाला त्यावेळी शिवसेना पक्षाचे युवा कार्यकर्ते श्री.सचिन देसाई यांनी आर्थिक स्वरूपाची केलेली मदत प्रभाकर पार्सेकर यांना आर्थिक स्वरूपाची उभारी देऊन गेली.कोरोनाच्या कालखंडात दशावतारी नाट्यमंडळांना संयुक्तपणे खासदार,आमदार,पालकमंत्री यांनी केलेली 6 लाखाची आर्थिक मदत व दशावतारी कलाकारांना वेळोवेळी केलेला धान्य पुरवठा,तसेच आयटी मुक्त विद्यापीठ मुंबई यांच्या मार्फत वयोवृध्द कलावंत यशवंत तेंडोलकर,अनिल घावनाळकर,संजय गोठोसकर,रविंद्र खानोलकर,दिलीप मेस्री यांना प्रत्येकी 3 महीने रोख रुपये 5000 देण्याची व्यवस्था करणारे खासदार,आमदार,पालकमंत्रीच होते.येत्या नवरात्र उत्सवात धार्मिक क्षेत्रे उघडून नाट्यप्रयोक सादर करण्याची संधी उपलब्ध करून देणारे खासदार,आमदार,पालकमंत्रीच आहेत. वृध्द कलाकार मानधन समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी राजा सामंतांची निवड करुन जिल्ह्याची कार्यतत्पर समिती स्थापन करून जास्तीत जास्त दशावतारी वृध्द कलाकारांना सामावून घेण्यात व चतुर्थीपुर्वी सर्व कलाकारांच मानधन त्या सर्व कलाकारांच्या खात्यात जमा करण्यात खासदार, आमदार,पालकमंत्री साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.दशावतारी मालकचालक संघटना असो किंवा जिल्हास्तरावरती कार्यरत असणाऱ्या दशावतारी कलाकारांच्या इतर संघटना असोत या सर्वांनी सध्याच्या घडीला आपसातील हेवेदावे बाजूला ठेवून एकत्रित येण गरजेच आहे.तसेच खासदार आमदार पालकमंत्री यांना विश्वासात घेउन या दशावतारी कलेबरोबरच इतर सर्व लोककलांना एकत्रित आणल्यास कलाकारांची एक वज्रमुठ तयार होईल त्यामुळेच आपल्याला भविष्यात खर्या अर्थाने हक्काचा राजाश्रय मीळू शकतो.आपला लोकराजा सुधीर कलिंगण.

अभिप्राय द्या..