You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषद तर्फे स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर..

वेंगुर्ला नगरपरिषद तर्फे स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर..

वेंगुर्ला /_


वेंगुर्ले नगरपरिषदेमार्फत आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१- २२ स्वछता व पर्यावरण संवर्धन मोहिमेअंतर्गत ध्यास स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले.या पथनाट्यद्वारे नागरिकांना स्वच्छता संदेश देण्यात आले.केंद्र शासनामार्फत सन २०२१-२२ हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्याचे आदेश नगरपरिषद व नगरपंचायत यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार “आझादीका अमृत महोत्सव” ही स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जात आहे.या अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दि.२६ जुलै ते दि.२ ऑक्टोबर या कालावधीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव २०२१ या अभियान अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून आज ध्यास स्वछतेचा हे पथनाट्य शहरात सादर करण्यात आले. शहरातील सागररत्न मत्स्य बाजारपेठ येथे तसेच दाभोली नाका येथे सखी स्वयंसहाय्यता महिला बचत गट खांबड भटवाडी वेंगुर्ला यांच्या मार्फत हे स्वछता संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले. या पथनाट्यात शहरात स्वछता ठेवा, उघड्यावर कचरा टाकू नका, नगरपरिषदेने दिलेल्या कचरा पेटीचा वापर करून कचरा वर्गीकरण करा व घंटागाडीत तो कचरा द्या प्रकारचे अनेक संदेश देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे,गटनेते प्रकाश डिचोलकर, नगरसेविका शितल आंगचेकर, नगरसेवक धर्मराज कांबळी यांच्यासाहित नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विलास ठुम्बरे, शहर समन्वयक सुश्मित चव्हाण, समूह संघटक अतुल अडसूळ यांनी या पथ नाट्याचे नियोजन केले.

अभिप्राय द्या..