You are currently viewing वेंगुर्ले येथे ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यशाळा..

वेंगुर्ले येथे ग्रामपंचायत विकास आराखडा कार्यशाळा..

वेंगुर्ला /-


राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजनेतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधीची दोन दिवशीय कार्यशाळा येथील साईमंगल कार्यालय येथे झाली. उद्घाटन सभापती अनुश्री कांबळी यांच्या हस्ते करून करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी उमा पाटील, कनिष्ठ सहाय्यक दत्ताराम वालावलकर, सुनील राऊळ, स्वप्नील जाधव, सुहास गोसावी, राधाकृष्ण तुळसकर, भालचंद्र केळजी, तालुका समन्वयक गणेश अंधारी प्रशिक्षक संतोष पाटील, तुकाराम साईल आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत प्रशिक्षक संतोष पाटील व तुकाराम साईल यांनी ग्रामपंचायतीचे विकास आराखडे कसे बनवायचे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तर सभापती कांबळी व गटविकास अधिकारी उमा पाटील यांनीही उपस्थित सरपंच व ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले. व्ही. पी. गावडे यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..