You are currently viewing आचरा रामेश्वर मंदिर गणपती विसर्जन..

आचरा रामेश्वर मंदिर गणपती विसर्जन..

आचरा /-

आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थानच्या गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचे गुरुवारी २१दिवसांनी पारंपरिक पद्धतीने आचरा पारवाडी खाडीपात्रात करण्यात आले.
कोरोना महामारीत आलेल्या निर्बंधामुळे पुर्वी४२दिवस चालणारा हा गणेशोत्सव गेल्या वर्षी पासून२१दिवसांचा करण्यात आला आहे. दुपारी दोन च्या सुमारास श्री देव रामेश्वर मंदिरातून श्रींची मुर्ती पारंपरिक ढोल ताशाच्या साथीने आचरा देवूळवाडी येथून पारवाडी मार्गे आचरा पारवाडी येथील नदिपात्रात नेण्यात आली. या विसर्जन सोहळ्यास देवस्थान समिती अध्यक्ष मिलिंद मिराशी,गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व देवस्थान समिती सदस्य अशोक पाडावे ,मानकरी महेश मिराशीयांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेत हा विसर्जन सोहळा संपन्न झाला. या विसर्जन सोहळ्यासाठी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सुनील चव्हाण, अक्षय धेंडे, जगताप, चव्हाण, जाधव आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा