You are currently viewing डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद–श्रीकांत सांबारी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भोगटे डॉक्टर द्वयींचा वैभवशाली पतसंस्थेच्या वार्षिक सभेत केला गेला सन्मान..

डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद–श्रीकांत सांबारी कोरोना काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भोगटे डॉक्टर द्वयींचा वैभवशाली पतसंस्थेच्या वार्षिक सभेत केला गेला सन्मान..

आचरा /-

कोरोना काळात रक्ताची नाती दुरावत असताना आपला जीव धोक्यात घालून रुग्ण सेवा देणारया डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार वैभवशाली रामेश्वर पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत सांबारी यांनी काढले.
वैभवशाली रामेश्वर पतसंस्थेची वार्षिक सभा सांबारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
यावेळी कोरोना काळात आचरा येथे रुग्ण सेवा देणारे डॉक्टर स्वप्नील भोगटे,डॉ स्वरा भोगटे, डॉक्टर प्रमोद कोळंबकर यांचा सत्कार त्यांच्या हस्ते केला गेला. यावेळी ते बोलत होते .यावेळीत्यांच्या सोबत पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुरेश हडकर, संचालक प्रदिप पेडणेकर,लक्ष्मण आचरेकर, राजन पांगे, संदिप पारकर, वामन आचरेकर, दिलिप कावले, मनोज वाडेकर, डॉ कोळंबकर, मंदार सांबारी, सरीता परब,रचना जोशी,चंद्रकांत कुबर, मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत राणे, राजा जोशी यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा