You are currently viewing मास्टरशेफ आरती वायंगणकर यांचा शिवसेना कणकवली महिला आघाडीतर्फे सत्कार..

मास्टरशेफ आरती वायंगणकर यांचा शिवसेना कणकवली महिला आघाडीतर्फे सत्कार..

कणकवली /-

महाराष्ट्र राज्य शासनातर्फे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधुन आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्राचा मास्टरशेफ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातुन द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कणकवलीतील सौ.आरती मकरंद वायंगणकर यांचा शिवसेना कणकवली तालुका महिला आघाडीच्यावतीने त्यांच्या कलमठ येथील निवासस्थानी जाऊन सौ.प्रतिक्षा साटम यांच्या नेतृत्वाखाली शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेना कणकवली तालुका महिला आघाडी माजी तालुकाप्रमुख प्रतिक्षा साटम, स्नेहा तेंडुलकर, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर, माजी विभागप्रमुख जैबा कुरेशी, कणकवली शाखाप्रमुख मिनल म्हसकर, बोर्डवे शाखाप्रमुख शोभा बागवे, रिद्धी साटम आणि सौ.वायंगणकर यांचे पती मकरंद यांच्यासह सर्व कुटुंबिय उपस्थित होते. महाराष्ट्राचा मास्टरशेफ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातुन द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कणकवलीतील सौ.आरती मकरंद वायंगणकर यांना शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे गौरविण्यात आले होते. या गौरव समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, युवासेनाप्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा