You are currently viewing स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी आ. केसरकर घालत आहेत अम्युझमेंट पार्क प्रकल्पाचा घाट.;भाजप तालुकाध्यक्ष प्रविण गवस यांचा आरोप.

स्वतःचा आर्थिक फायद्यासाठी आ. केसरकर घालत आहेत अम्युझमेंट पार्क प्रकल्पाचा घाट.;भाजप तालुकाध्यक्ष प्रविण गवस यांचा आरोप.

दोडामार्ग /-

तिलारी धरणग्रस्त शेतकरी यांच्या जमिनी कवडीमोलाने शासनाने धरण बांधण्यासाठी संपादित केल्या होत्या, चांगल्या जमीनी घेऊन स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावले,त्यांचे पुनवर्सन व अन्य मागण्या पूर्ण केल्या नाहीत.अद्यापही काही पुनवर्सन गावठाणातील पायाभूत मूलभूत सुविधा पूर्ण करून देण्यास आमदार दिपकभाई केसरकर शासन दरबारी कमी पडत आहेत.पुनर्वसन गावठणांना मुख्य जोड रस्ते देऊ शकले नाहीत.प्रकल्पग्रस्तांनी वारंवार उपोषणे,आंदोलने केली असता,दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत.आपण दिलेला शब्द अधिकारी वर्गाकडून पूर्ण करुन घेण्याची धमक आमदारांत नाही.नवनवीन प्रकल्पांचे गाजर दाखवत कवडीमोल दरात तिलारी धरणासाठी म्हणून घेतलेल्या जमिनी खाजगी उद्योजकांना देण्यासाठी वारंवार दोडामार्गला भेटी देण्यामागचा आमदारांचा स्वार्थ न समजण्याईतके दोडामार्गवासीय अज्ञानी नक्कीच नाहीत.केवळ नवीन पानावरून सुरुवात करावी याचसाठी आमदार दिपकभाई केसरकर आपल्या दोडामार्गच्या प्रत्येक दौऱ्यात नवनवीन प्रकल्पाची वही उघडत असतात.हे करताना स्थानिक प्रश्नांची माहीती शून्य.त्यामुळे आता आपल्या कामकाजाच्या शैलीप्रमाणे स्थानिकांस हळुवारपणे डावलत अम्युझमेंट पार्क प्रकल्पाआड केवळ कोट्यवधी रुपयांच्या फायद्यासाठी आमदार नवीन प्रकल्पाचा घाट घालत आहेत असा आरोप भाजपा तालुकाध्यक्ष प्रविण गवस यांनी केला आहे.

अभिप्राय द्या..