You are currently viewing वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन..

वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन..

वेंगुर्ला /-

केंद्र शासनामार्फत सन २०२१-२२ हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे करण्याचे आदेश नगरपरिषद व नगरपंचायत यांना प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ‘आझादीका अमृत महोत्सव‘ (ऋृख़्त्र*ृग्) ही स्वच्छता व पर्यावरण संवर्धन मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत दि.२६ जुलै ते दि.२ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. कचरा वर्गीकरण जनजागृती अमृत मोहीम सुरु केली असून वेंगुर्ला न.प.तर्फे घरोघरी जाऊन ओला व सुक्या कच-यासाठी दोन कचराकुंड्या, कापडी पिशवी, मांस व मासे खरेदीसाठी नायलॉन पिशवी आदींचे वाटप करण्यात येत आहे. तयेच स्वच्छतेप्रती जनजागृतीकरीता प्रत्येक कुटुंबास स्वच्छता व वसुंधरा शपथ घेण्याचे आवाहन केले जात आहे. वेंगुर्ला शहराचे हरित आच्छादन वाढविण्यासाठी प्राचीन वृक्ष शोध व संवर्धन मोहित सुरु केली असून शहरातील ५० वर्षाहून अधिक जुन्या वृक्षांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरु आहे. शहरातील सर्व सामाजिक अवयव स्वच्छतेप्रती जागरुक रहावे व त्याप्रती स्पर्धात्मक सातत्य टिकावे यासाठी सर्व शाळा, हॉटेल्स, रुग्णालय व रहिवासी संकुले यांचे स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून गुप्त मुल्यांकन सुरु असून यातील विजेत्यांना २ ऑक्टोबर रोजी सन्मानित केले जाणार आहे. दि.१ ऑक्टोबर रोजी नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात कच-यापासून कलाकृती, टाकाऊ पासून टिकाऊ, कच-यापासून इंधन निर्मिती यावर प्रदर्शनपर स्पर्धा आयोजित केली आहे. यात शहरातील सर्व शाळा व महाविद्यालये सहभाग घेणार आहेत. न.प.मार्फत पुरविण्यात येणा-या सेवा व योजनांचा लाभ व माहिती होण्यासाठी घंटागाडी व वेंगुर्ला नगरपरिषद अॅपचे अनावरण २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या अॅपचा उपयोग शहरातील कचरा संकलन सहज होण्यास व मालमत्तांचा आढावा घेण्याकरीता होणार आहे. दि.२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण, स्वच्छता अभियानात योगदान देणा-या नागरिक व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा