You are currently viewing ट्रॅव्हल्समध्ये विसरलेली पर्स मूळ मालकाकडे केली सुपूर्द!

ट्रॅव्हल्समध्ये विसरलेली पर्स मूळ मालकाकडे केली सुपूर्द!

मसुरे /-

आचरा येथून मुंबई येथे प्रवास करताना खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये विसरलेली पर्स मूळ मालकास परत केल्या बद्दल ट्रॅव्हल्स मालक उमेश बाणे यांचे कौतुक होत आहे.
पोयरे येथील सौ लीना तुषार सावंत या अंधेरी – मुंबई येथे राहतात. गणपतीला त्या गावी गेल्या होत्या. दिनांक २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आचरा येथून शिवरामेश्वर (बाणे) ट्रॅव्हल्स ने मुंबईला येण्यास त्या कुटुंबियां सोबत निघाल्या होत्या. २१ रोजी सकाळी मुंबई येथे उतरण्याच्या घाई गडबडीत त्यांची पर्स गाडीमध्ये राहिली. या पर्स मध्ये मंगळसूत्र, रोख रक्कम आणि एटीएम कार्ड असे सुमारे दोन लाखाचा ऐवज होता. पर्स गाडीत विसरल्याचे लक्षात येताच त्वरित त्यांनी बसचे चालक यांच्याशी संपर्क साधला. चालक आदित्य नार्वेकर यांनी गाडीत शोध घेऊन पर्स ताब्यात घेतल्याचे त्यांना सांगितले. व मुंबईच्या कार्यालयातून ओळख पटवून नेण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी सौ लीना सावंत यांनी सदर पर्स सर्व साहित्यासह ताब्यात घेत उमेश बाणे व चालक आदित्य नार्वेकर यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा