You are currently viewing सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचे प्रवीण दरेकर यांच्या बॅनरवर जोडे मारून निषेध ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला झाल्या आक्रमक..

सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपचे प्रवीण दरेकर यांच्या बॅनरवर जोडे मारून निषेध ! राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला झाल्या आक्रमक..

सावंतवाडी /-

भाजप नेते तथा विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने प्रविण दरेकर यांचा निषेध करण्यात आला. यावेळी प्रविण दरेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी त्यांच्या बॅनर वर जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी उद्योग व व्यापार जिल्हाध्यक्षा चित्रा देसाई यांनी प्रविण दरेकर यांनी आपले वक्तव्य मागे न घेतल्यास प्रविण दरेकर हे सिंधुदुर्गात आल्यास त्यांचे गाल व थोबाड रंगविण्याचा कार्यक्रम केला जाईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष उद्योग व व्यपार चित्रा देसाई, माजी नगरसेवीका अफरोज राजगुरू जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व व्यपार हिदायतुल्ला खाना शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर,तालुका कार्याकारणी सदस्य ऑगस्टीन फर्नांडिस, जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग इफ्तेकार राजगुरू, कोणाबरोबर तालुकाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग जावेद शेख, पदवीधर मतदार संघ तालुकाध्यक्ष सावंतवाडी प्रसाद दळवी, व्हीजेटी जिल्हाध्यक्ष आशोक पवार, याकुब शेख शफीक खान,जहिरा खाजा, अल्फिया पटेल ,अमिषा पटेल,सायली पाटकर,आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..