You are currently viewing बेपत्ता नारायण बाबुराव सारंग यांचा मृतदेह आढळला देवबाग कर्ली खाडीपात्रात

बेपत्ता नारायण बाबुराव सारंग यांचा मृतदेह आढळला देवबाग कर्ली खाडीपात्रात

मालवण /-

 
दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या देवबाग केळुसकरवाडी येथील नारायण बाबुराव सारंग ऊर्फ बाबा सारंग (वय ५४) यांचा मृतदेह आज दुपारी देवबाग कर्ली खाडीपात्रात आढळून आला. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
देवबाग येथील बाबा सारंग हे गेली काही महिने प्रदीर्घ आजाराने आजारी होते. काही दिवस ते उपचारही घेत होते. मात्र रविवार दिवसांपासून ते बेपत्ता झाले होते. रविवारी त्यांनी देवबाग कर्ली खाडी पात्रात उडी घेतल्याची स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा होती. कुटुंबियांकडून त्यांचा शोध सुरू होता. आज त्यांचा मृतदेह देवबाग खाडीत आढळून आला. आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगे मुली असा परिवार आहे.
याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, पोलीस हवालदार, सुभाष शिवगण, सिद्धेश चिपकर हे करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा