You are currently viewing मालवण येथे स्पर्धा परिक्षांबाबत व्याख्यान संपन्न..

मालवण येथे स्पर्धा परिक्षांबाबत व्याख्यान संपन्न..

मालवण /-

सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या पंचक्रोशीत निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यान घेण्यात आले. देऊळवाडा मालवण येथे नगरसेविका पूजा करलकर यांनी हे व्याख्यान आयोजित केले होते.
मुंबई सीमाशुल्कचे कनिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान रेडकर यांनी मार्गदर्शन केले. नगरसेविका पूजा करलकर, प्रमोद करलकर, दीप जुवेकर, निकिता चव्हाण, प्रणाली करलकर, सान्वी यादव, सिद्धी जाधव, दीप करलकर, वेदांत पाटकर, अनिल कदम, ऐश्वर्य मांजरेकर, सिद्धेश करंगुटकर, प्रांजल चव्हाण, दिव्या चव्हाण, पूनम माडये, तेजस्वी पाटकर, अंकिता मणचेकर, साक्षी पाटकर आदी उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात आंबडोस पंचक्रोशीमध्ये सरपंच राधा वरवड़ेकर यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात देऊळवाडा मालवण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अनंत चतुर्दशी असूनही साडेचार वाजता व्याख्यानाची सुरुवात झाली व नऊ वाजता व्याख्यानाची समाप्ती झाली. आभार अनिल कदम यांनी मानले. या व्याख्यानामध्ये युवक व युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अभिप्राय द्या..