You are currently viewing महिला आणि तरुणांना रोजगारक्षम बनविण्याचे काम वायडब्ल्यूएच्या माध्यमातून करणार..

महिला आणि तरुणांना रोजगारक्षम बनविण्याचे काम वायडब्ल्यूएच्या माध्यमातून करणार..

संस्थेचे अध्यक्ष तेजस घाडीगावकर यांचे प्रतिपादन

कणकवली / –

विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक विकासाला चालना देताना महिला आणि तरुणांना रोजगारक्षम बनविण्याचे काम युथ वेल्फेअर असोसिएशन अर्थात वायडब्ल्यूएच्या माध्यमातून करणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष तेजस घाडीगावकर यांनी म्हटले आहे.

युथ वेल्फेअर असोसिएशन ( वायडब्ल्यूए ) या संस्थेच्या माध्यमातून तिवरे, हलवल, फोंडा, पळसंब, बिडवाडी या गावांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या समित्यांना नोंदणी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामीण भागाचा विकास आणि त्या सोबतच महिला भगिनी आणि युवा वर्गाच्या हाताला काम मिळवून देणे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे. आज शासनाच्या विविध योजना आहेत ज्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. मात्र आज मनात विचार असूनही आपल्याला पुरेशी माहिती नसल्याने या योजनांपर्यंत आपण पोचू शकत नाही. मात्र संस्थेच्या माध्यमातून याबाबत सहकार्य करण्याचे काम करण्यात येईल, गावागावात शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविले जातील असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी संस्थेचे सचिव रुपेश घाडी म्हणाले कि, आगामी काळात जिल्ह्यात संस्थेच्या २५० समित्या स्थापन केल्या जातील. या समित्या गावागावात आमच्या संस्थेचा अविभाज्य घटक म्हणून काम करतील. संस्थेच्या ध्येयधोरणानुसार काम करताना गावाच्या समस्या समजून घेऊन त्या मार्गी कशा लावता येतील याचा विचार केला जाईल. त्यामुळे गावागावात स्थापन केल्या जाणाऱ्या समित्यांमध्ये कुणालाही सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी संस्थेचे खजिनदार एल्टन नोरोन्हा, सह सचिव रऊफ काझी, सदस्य राजेश बांदिवडेकर, विनोद परमार, इर्शाद खान, विवेक ताम्हणकर, अनिकेत घाडीगावकर, पंडित परब, विराज तावडे, तिवरे गावचे समिती अध्यक्ष देवेंद्र तेली, बिडवाडी अध्यक्ष माधवी मारुती पवार, फोंडाघाट अद्यक्ष गौरव सुरेश बागवे, पळसंब अध्यक्ष हितेश मंगेश सावंत, हळवल अध्यक्ष अक्षय तांबे यांच्यासह सर्व समित्यांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

अभिप्राय द्या..