You are currently viewing ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी आवाहन..

ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी आवाहन..

वेंगुर्ला /-


वेंगुर्ले नगरपरिषदमध्ये नागरी सुविधा केंद्रामध्ये असघंटीत कामगारासाठी ई-श्रम कार्ड नोंदणी सुविधा उपलब्ध केली आहे.यात लहान व सिमांत शेतकरी, शेतमजूर, सुतार, कुंभार, न्हावी, पशुपालन करणारे, आशा कामगार, अंगणवाडी सेविका, पथविक्रेते, बांधकामगार, दूध उत्पादक, चर्मकार, भाजी आणि फळविक्रेते, ऑटोचालक, गवंडी, लोहार, सुरक्षाकर्मी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, शिवणकाम करणारे, बेकरी, पुरोहित, मिटर रिडर, धोबी, दुकान विक्री सहाय्यक, वेटर आदी कामगार ई-श्रम कार्ड नोंदणी करु शकतात. अर्जदार १६ ते ५९ वय वर्षे असणारा असंघटीत असावा, तो आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा. येताना आधारकार्ड, बँक पासबुक व आधारशी लिक असलेला मोबाईल नंबर द्यावा.वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील असंघटीत कामगारांन २३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत कार्यालयीन वेळेत नागरी सुविधा केंद्रामध्ये ई-श्रम कार्ड नोंद करुन घ्यावी, असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी नगरपरिषद कार्यालय – ०२३६६२६२०२७, विठ्ठल सोकटे-९५६११०४५८३, नॅशनल हेल्पलाईन नंबर-१४४३४, टोल फ्री नंबर १८००१३७४१५० यावर संपर्क साधावा.

अभिप्राय द्या..