You are currently viewing 30 सप्टेंबर पर्यंत करता येणार नवीन मतदार नोंदणी नवमतदारांनी नोंदणी करण्याचे तहसीलदार झळके यांचे आवाहन..

30 सप्टेंबर पर्यंत करता येणार नवीन मतदार नोंदणी नवमतदारांनी नोंदणी करण्याचे तहसीलदार झळके यांचे आवाहन..

वैभववाडी /-

महाराष्ट्र राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. त्यामुळे नुतन मतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. १ जानेवारी २०२२ पर्यंत वय वर्षे १८ पूर्ण होणाऱ्या नवीन मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्याकडे संपर्क साधण्याचे तहसिलदार कार्यालया मार्फत व निवडणूक अधिकारी यांच्यावतीने मतदारांना आवाहन करण्यात येत आहे.

नवीन मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

घरातील मुलगा/मुलगी यांच्या नाव नोंदणीसाठी कागदपत्रे

१) जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
२) रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा
३) आधार कार्ड झेरॉक्स
४) २ पासपोर्ट साईज फोटो
५) घरातील नात्यातील (आई, वडील, भाऊ, बहीण) यांपैकी एकाचे ज्यांचे नाव अगोदर मतदार यादीत समाविष्ठ असेल तर त्यांच्या मतदान ओळखपत्राची झेरॉक्स

घरातील सुनबाईचे नाव समाविष्ट करण्यासाठी कागदपत्रे

१) जन्म पुरावा-शाळा सोडल्याचा दाखला/बोनाफाईड सर्टिफिकेट
२) रहिवासी बाबत स्वयंघोषणा दाखला स्वत:च्या सहीचा
३) २ पासपोर्ट साईज फोटो
४) माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला.
५) माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
६) पतीचे मतदार ओळखपत्र झेरॉक्स
७) लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी दाखला

प्रतिक्रिया व्यक्त करा