You are currently viewing साहित्य खरेदी भ्रष्टाचाराच्या चौकशीची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मागणी..

साहित्य खरेदी भ्रष्टाचाराच्या चौकशीची राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची नगरविकास राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मागणी..

तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मंत्री तनपुरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश..

दोडामार्ग /-

दोडामार्ग नगरपंचायतीची सक्शन व्हॅन, स्ट्रीट लाईट, अग्निशमन साहित्य खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.. त्या खरेदीची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष व सचिव रामचंद्र ठाकूर यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी कसई दोडामार्ग यांच्याकडे सर्व पुरावे देऊन केली होती. मात्र सदरची चौकशी करण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे दोडामार्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची माहिती समजताच अमित सामंत यांनी पक्ष निरीक्षक आमदार शेखर निकम यांच्यासह राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची आज मुंबई मंत्रालय येथे भेट घेतली आणि पुरावे सादर केले. तसेच कसई दोडामार्ग नगरपंचायतीने केलेल्या साहित्य घोटाळ्याची चौकशी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांचे मार्फत करण्याची मागणी केली. त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी एक महिन्याच्या मुदतीत सखोल चौकशी करून अहवाल शासनास सादर करण्याचे लेखी आदेश सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

अभिप्राय द्या..