You are currently viewing अवैध गुरे वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल ग्रामस्थ आणि पोलिसांच्या सजगतेने गुन्हा उघड..

अवैध गुरे वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल ग्रामस्थ आणि पोलिसांच्या सजगतेने गुन्हा उघड..

कणकवली /-

तालुक्यातील फोंडाघाट चेकपोस्ट येथे पोलीसांनी अवैध गुरे वाहतूक प्रकरणी टेम्पो सह दोघांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री १.४५ वाजण्याच्या सुमारास केली.याबाबत पोलीस शिपाई अमोल परशुराम जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.अमोल जाधव हे  सोमवारी रात्री फोंडाघाट चेकपोस्ट येथ डयुटीस असताना फोंडाघाट बाजारपेठेकडुन राधानगरी – कोल्हापुरकडे जाणारा एक सफेद रंगाचा  बोलेरो टेम्पो क्रमांक ( एम एच ११ बी एल ०२८९ ) याला थांबवुन संबंधित गाडीवरील चालकास गाडीत काय आहे असे विचारले. त्यावेळी त्याने गाडीमध्ये ६ बैल असल्याचे सांगीतले .

त्यावेळी गाडीचे चालकाने बैल हे आपण तळगाव , राजापुर येथील पांडु खान याचेकडुन विकत घेतल्याचे सांगीतले. आणि ही गुरे आपण मुरगुड येथे दुस-या गाडी मध्यभरून कर्नाटक येथे कत्तलीसाठी पाठविण्यात येत असल्याचे सांगीतले .त्यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने संबंधित गाडीच्या हौदयाची तपासणी केली असता सहा बैल असल्याचे दिसुन आले.तसेच अवैध गुरे वाहतूक प्रकरणी चालक प्रविण बाळासो घोटणे ( ३० रा . मुरगुड , कागल, कोल्हापुर ) व  वैभव सुखदेव रामाने (  २२ रा.मुरगुड शाहुनगर कोल्हापुर ) यांच्या विरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान संबंधित गुरे ही वागदे येथील गोपूरी आश्रम येथे ठेवण्यात आली आहेत. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

अभिप्राय द्या..