You are currently viewing राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांचे केले सांत्वन..

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांचे केले सांत्वन..

कणकवली /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांच्या घरी जात त्यांचे सांत्वन केले. राजू पावसकर यांची आई श्रीमती निर्मला यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी १६ सप्टेंबर रोजी निधन झाले. पावसकर कुटुंबियांवर ऐन गणेशोत्सवात आईच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्यासह राजू पावसकर यांच्या फोंडाघाट येथील घरी जात त्यांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुडाळ येथील व्यापारी विशाल देसाई, संदेश मयेकर, देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा