वैभववाडी /-

रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटरच्या वतीने निबंध, पुस्तक समिक्षण व पोस्टर स्लोगन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा कसाल, ओरोस, पडवे, रानबांबुळी, कुंदे, पोखरण, कुसबे, आब्रड, डिगस, पणदुर, अणाव, ओसरगाव, सुकळवाड, गावराई व कळसुली या दशक्रोशीतील शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. ही स्पर्धा माध्यमिक गट (इयत्ता आठवी ते दहावी), व उच्च माध्यमिक गट (अकरावी ते बारावी), या विद्यार्थ्यांसाठी राहणार आहे.

माध्यमिक गट स्पर्धा प्रकार – निबंध स्पर्धा (शब्दमर्यादा ४०० ते ४५०)- विषय १) कोरोना मुक्त गाव माझी जबाबदारी, २) आरोग्य साक्षरतेची गरज व महत्त्व.

उच्च माध्यमिक गट- स्पर्धा प्रकार – पुस्तक समिक्षण. यामध्ये विद्यार्थ्याने आपण वाचलेल्या कोणत्याही एका पुस्तकाचे समिक्षण करावे. ते समिक्षण लिखित स्वरूपात सादर करावे. निवडक स्पर्धकांना परीक्षकांसमोर समीक्षण सादर करावे लागणार आहे.

स्पर्धा प्रकार – पोस्टर स्लोगन स्पर्धा- विषय १) कोरोना मुक्ती अभियान, २) पुर परिस्थितीत मदत कार्य.

वरील कोणत्याही एका विषयावर योग्य संदेश देणारे बोलके पोस्टर तयार करावे. त्याला साजेसे स्लोगन लिहावे. पोस्टर पूर्ण कार्डशीट पेपरवर विद्यार्थ्याने स्वतः रंगवावे. त्यावर नाव, मोबाईल नंबर लिहुन २० सप्टेंबर पर्यंत कोलते हॉस्पिटल कसाल येथे जमा करावे.

प्रत्येक स्पर्धा प्रकारात प्रथम तीन क्रमांक काढण्यात येणार आहे. रोख बक्षीस व प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना क्लब तर्फे सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी श्री. बागवे- 9423369770, श्री. आळवे- 986081402, याच्याशी संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page