You are currently viewing शिरोडा येथील युवा गायक गौरव धुरी सहकाऱ्यांसह झी मराठी वाहिनीवर…

शिरोडा येथील युवा गायक गौरव धुरी सहकाऱ्यांसह झी मराठी वाहिनीवर…

वेंगुर्ला/-

तालुक्यातील शिरोडा बागायतवाडी येथील भजन मंडळातील युवा गायक आणि भाजनिबुवा गौरव धुरी आणि पखवाज वादक उमेश नाईक यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना झी मराठी वाहिनीवर सद्या गाजत असलेल्या “रात्रीस खेळ चाले ३” या कार्यक्रमात भजन सेवा करण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमातील कलाकारांसह सर्व स्तरातून या भजनाचा व युवा भजनी कलाकारांचे कौतुक होत आहे.

मुंबईत कामानिमित्त रहाताना गौरव अनेक ठिकाणी भजन करायचा. त्याचे सुरेल भजन अनेकांना मंत्रमुग्ध करायचं. त्याच्या मित्र मंडळींना पण ते खूप आवडायचं. यावर्षी गणेशोत्सव कालावधीत “रात्रीस खेळ चाले” या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये दिग्दर्शकाना गणपती बाप्पा समोर भजन चालू आहे हा सीन दाखवायचा होता. त्यामुळे भजनी बुवा आणि सहकारी पाहिजे हा विषय पुढे आला. याबाबत कुडाळ येथील गौरव यांच्या मित्रांना हे समजल्यावर त्यांनी गौरवला फोन केला, आणि निमंत्रण दिले. गौरव याला याचा आनंद झाला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याने होकार दिला. आणि १ सप्टेंबर रोजी सकाळी स्वतः हार्मोनिअम वादक-गौरव धुरी, पखवाज वादक- उमेश नाईक, सहाय्यक गुरुनाथ सावंत, प्रशांत सावंत, निलेश नाईक, संदीप वारंग, सच्चीदानंद सावंत आम्ही आकेरी येथे मालिकेच्या सेट वर पोहचलो. तिकडे गेल्यानंतर मला मित्र जे बोलला ते खर वाटलं त्या आधी मला विश्वासच बसत नव्हता आणि झी मराठी सारख्या मोठ्या वहिनीच्या कॅमेरा फेस करायचा आमचा पहिलाच अनुभव होता. तिकडे गेल्यानंतर तिकडचे ऍक्टर कॅमेरामेन आणि इतर मंडळी यांच्या सोबत चांगली मैत्री झाली. त्यामुळे आम्ही रात्रीस खेळ चाले 3 चे आणि झी मराठी वाहिनी चे खूप खूप आभार मानतो, असे गौरव याने सांगितले. आमचा हा भजनाचा कार्यक्रम १५ सप्टेंबरला प्रसिद्ध झाला आणि आम्हाला वेगळी अशी ओळख मिळाली, असेही त्याने आवर्जून सांगितले.

अभिप्राय द्या..