You are currently viewing जिल्हा बँक निवडणूक भाजपा जिंकणार.;जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा दावा..

जिल्हा बँक निवडणूक भाजपा जिंकणार.;जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा दावा..

कणकवली /-

जिल्हा बँकेची निवडणूक आता जवळ येऊन ठेपली आहे. असे असताना भाजपच्या काही सभासदांवर जिल्हा बँकेने हेतुपुरस्सर आक्षेप ठेवलेले आहेत. २१ सप्टेंबरला त्याची सुनावणी नवी मुंबईत होणार आहे. निवडणूक आहे सिंधुदुर्ग बँकेची आणि सुनावणी आहे दुसरीकडेच. परंतु माझा विश्वास आहे, सत्याचा विजय होणार आणि जे काही आमच्यावर आक्षेप असतील ते निश्चितपणे दूर होऊन भाजपाचे सगळे सभासद मतदानाला पात्र होतील. एक जुना सहकारी म्हणतोय की जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध झाली असती तर चांगल झाल असत. आमचाही सहकारात राजकारण आणण्याचा विचार नाही. आधीच जर अशा प्रकारचा प्रस्ताव आला असता निर्णय घेता आला असता. परंतु आघाडीतल्या सगळ्या पक्षांनी आधीच सीट वाटप करून झालंय. जर काही चांगला प्रस्ताव आला तर पक्षाचे वरिष्ठ त्यावर विचार करतील. नसेल तर निवडणुका चांगल्या वातावरणात पार पाडून निवडणूक जिंकून सर्वसामान्यांची जिल्हा बँक चांगल्या पद्धतीने उन्नती साधण्यासाठी भाजपा निश्चितपणे प्रयत्नशील राहील, असे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

शिवसेना खास. विनायक राऊत म्हणतात, की दोन वर्षांत राज्याला केंद्राकडून पैसे आले नाहीत. विनायक राऊत कोणत्या चष्म्यातून बघतात ते समजत नाही. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग झाला, त्याला केंद्र शासनामार्फतच निधी आला होता. रेल्वेचे दुपदरीकरण, विद्युतीकरण केंद्र सरकारमुळे शक्य झालय. ८० कोटी लोकांना मोफत धान्य नोव्हेंबरपर्यंत केंद्र सरकारमार्फत देण्यात येणार आहे. देशातील ७७ कोटीपेक्षा जास्त लोकांचं मोफत लसीकरण केंद्र शासनामार्फत करण्यात आले. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एकाच दिवशी अडिच कोटी लोकांना लस देण्यात आली. केंद्र सरकारने कोरोनाच्या काळात सर्वसामान्य जनतेला, व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा काम केलं. पण राज्य सरकारने या कोरोनाच्या काळात कोणती भूमिका बजावली? लसिंसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ७ हजार कोटींचा चेक तयार आहे म्हणून सांगितलं होत. परंतु तो चेक अजून गहाळच झालेला आहे. रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील रस्त्यांची अगदी चाळण झालीय. तौत्के चक्रीवादळावेळी केंद्र शासनाने मदत केल्यानंतर राज्य सरकार जाग झालं. चिपी विमानतळ आता सुरू होत आहे. त्यावरून श्रेयवाद घेणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की हे एअरपोर्ट केंद्रीय मंत्री नारायण राणेंमुळे शक्य झालंय. परंतु तिथे जाण्यासाठी असणारा रोडही राज्य सरकारला सुस्थितीत आणता आला नाही. पाण्याची तसेच लाईटची सोयही तिथे झाली नाहीय. अंडरग्राऊंड विद्युतीकरण झाल नाहीय. रोजगाराच्या नावाखाली इथल्या तरुणांची केवळ चेष्टा केलीय. कोविड काळात नेमलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून काढून राज्य सरकारने त्यांना निर्दयीपणे वागवल. नारायण राणेंना मिळालेलं केंद्रीय उद्योग मंत्री पद कोकणवासीयांसाठी फायद्याचं आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्यात. त्यामुळे जिल्ह्यात चांगल्या प्रकारचे रोजगार निर्माण होतील. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात जे छोटेमोठे व्यवसाय उभे राहिलेले आहेत, त्यांना आपल्या खात्याच्या मार्फत पुनर्जीवित करण्यासाठी काय करता येईल, यावर विचार करण्याची मागणी आम्ही नारायण राणेंकडे केलेली आहे. नानार, सी-वर्ल्ड अशा विकास प्रकल्पांना शिवसेनेने कायम विरोध केला आहे. त्यामुळे नुसती बोंब मारण्यापेक्षा आपल्या राज्य सरकारने काय दिलंय, ते बघा. नुसती टीका करण्यापेक्षा राज्य सरकारची कामे सांगा,असा पलटवार राजन तेली यांनी विनायक राऊत यांच्यावर केला आहे.

अभिप्राय द्या..