You are currently viewing अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी संशयित संदीप जाधवला जामीन मंजूर..

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी संशयित संदीप जाधवला जामीन मंजूर..

कणकवली /

कणकवली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आशिये येथील आरोपी संदीप मनोहर जाधव याला जिल्हा विशेष न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट मिलिंद सावंत यांनी यशस्वी युक्तिवाद केला. तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी संदीप मनोहर जाधव ( रा.आशिये, ता.कणकवली ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा जून 2021 मध्ये घडला होता.या गुन्ह्यात आरोपी संदीप याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यापासून आरोपी संदीप जाधव हा न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये होता. सिंधुदुर्ग जिल्हा विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत ऍडव्होकेट मिलिंद सावंत यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपी संदीप जाधव याची 30 हजार रुपयांच्या सशर्त जामीनावर मुक्तता केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा