वेंगुर्ला /-


जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना आपआपल्या भागातील बुथरचना परिपूर्ण करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार समर्थ बुथ अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले.या अभियान अंतर्गत प्रत्येक बुथ वर बुथप्रमुख व ३० जणांची कमिटी बनविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत वेंगुर्ले तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करत तालुक्यातील ९३ ही बुथची रचना परिपूर्ण करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाची भेट दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातही १४ मंडलामध्ये प्रथम बुथरचना पुर्ण करण्याचा मान वेंगुर्ले भाजपाने मिळविला.भाजपामध्ये बुथला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्याठिकाणी बुथ मजबूत त्याठिकाणी पक्ष मजबूत, अशा भावनेतून पक्षाचे काम चालते. त्यानुसार भाजपा ला सर्वत्र यश मिळत आहे. या बुथरचनेच्या जिवावर भाजपाने अनेक विजय पादाक्रांत केले आहेत, असे प्रतिपादन सरचिटणीस प्रभाकर सावंत यांनी केले. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाने कार्यकर्त्यांना हे लक्ष दिले होते.
यावेळी वेंगुर्ले तालुक्याचे बुथ संयोजक व तालुका सरचिटणीस प्रशांत खानोलकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील २१ शक्ती केंद्र प्रमुखांनाही सन्मानित करण्यात आले.हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साठी महत्त्वाचे वर्षं आहे. कारण नरेंद्र मोदी हे राज्याचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान म्हणून ७ ऑक्टोबर २०२१ ला जनतेच्या आशीर्वादाने जनसेवक म्हणून २० वर्षे पुर्ण करीत आहेत .लोकशाहीत लोकनेता ही संधी फार कमी लोकांना मिळत असुन नरेंद्र मोदींची निरंतर वाढणारी लोकप्रियता दर्शवित आहे.त्यामुळेच यावर्षी पंतप्रधानांचा वाढदिवस जनसेवक म्हणून २० वर्षे कार्यकाल पुर्ण झाल्याचा सुखद योगायोग व आनंदी क्षण आहे.राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी यांच्या सुचनेनुसार १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात ” सेवा व समर्पण अभियान ” विवीध कार्यक्रमाचे आयोजन करुन राबविणार असल्याचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग संघटन मंत्री शैलेंद्रजी दळवी यांनी सांगितले.तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,जिल्हा चिटनीस अॅड. सुषमा खानोलकर,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जि.प.सदस्य प्रितेश राऊळ,जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, जेष्ठ नेते प्रकाश रेगे,ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे,आय.टी.सेलचे केशव नवाथे,शिरोडा सरपंच मनोज उगवेकर,किसान मोर्चा चे बाळु प्रभु,ज्ञानेश्वर केळजी, नगरसेवक प्रशांत आपटे, ता.चिटनीस समिर चिंदरकर , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, रविंद्र शिरसाट, महिला मोर्चा च्या रसिका मठकर, कार्यालय प्रमुख छोटु कुबल आदी उपस्थित होते.यावेळी वेतोरे – सुधीर गावडे, वायंगणी – शामसुंदर मुननकर, तुळस – संतोष शेटकर, मातोंड – दिपक परब, आरवली – महादेव नाईक, आसोली – विजय बागकर, अणसुर – गणेश गावडे, शिरोडा – विद्याधर ऊर्फ सतिश धानजी, परुळे – रुपेश राणे, उभादांडा – निलेश मांजरेकर, वेंगुर्ले शहर – प्रशांत आपटे इत्यादी शक्ती केंद्र प्रमुखांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page