You are currently viewing पालकमंत्र्यांचा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार..

पालकमंत्र्यांचा वेंगुर्लेच्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /-

तालुक्यातील कोचरे गावासाठी विविध माध्यमातून विकासकामांना वेळोवेळी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच येथील नवीन कार्यान्वित झालेल्या बीएसएनएल टॉवरच्या विद्युत पुरवठ्या साठीसुद्धा तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत यांचा सरपंच साची फणसेकर यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी संदेश पारकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष यशवंत परब, उपजिल्हाप्रमुख सुनील डुबळे, जि. प. सदस्य प्रदीप नारकर, अवधूत मालंडकर, शहर प्रमुख अजित राऊळ, उद्योजक भैया सामंत यांच्या सहित कोचेरे गावचे ग्रा. प. सदस्य प्रतीक्षा पाटकर, सरस्वती राऊळ, कोचरा सोसायटी चेअरमन ब्रिजेश तायशेटये, शिवसेना शाखा प्रमुख आपा राऊळ, ग्रामस्थ मुरलीधर उर्फ चंदू गावडे, मंदार तेली, विकास फणसेकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..