You are currently viewing झाराप बिडयेवाडीतील एकावर गैरकायदा दारू बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल..

झाराप बिडयेवाडीतील एकावर गैरकायदा दारू बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल..

कुडाळ /-

झाराप बिडयेवाडीतील सचिन परशुराम म्हापणकर (42)याच्यावर गैरकायदा बिगर परवाना दारू बाळगल्याप्रकरणी कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कुडाळ पोलिसांनी आज गुरूवारी दुपारी 12.15 वाजता केली.
कुडाळ पोलिसांना झाराप तळपिचे खडप येथे चोरटा दारू विक्री व्यवसाय चालतो अशी गोपनीय माहिती मिळाली. यानुसार पोलिस अमोल महाडीक, श्री. भांगरे, पोलिस नाईक श्री. प्रभु यांनी झाराप तळपिचे खडप येथे छापा टाकला. यावेळी सचिन म्हापणकर याच्या हातामध्ये एक पिशवी आढळली. पोलिसांनी या पिशवीची झडती घेतली असता आतामध्ये 2 हजार 70 रूपये किंमतीची नॅशनल डॉक्टर ब्रँन्डीच्या 23 बॉटल आढळल्या. या प्रकरणी सचिन म्हापणकर याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची फिर्याद पोलिस अमोल दत्ताराम महाडीक यांनी कुडाळ पोलिसात दिली आहे.

अभिप्राय द्या..